नमस्कार मित्रांनो आजच्या काळात प्रत्येक जण भविष्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न करतो. निवृत्तीनंतर आर्थिक संकट टाळण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक असते. याच विचारातून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एक नवीन एसआयपी (Systematic Investment Plan) योजना सुरू केली आहे, जिथे केवळ ₹250 पासून गुंतवणूक करून दीर्घकालीन बचतीतून ₹१७ लाखांहून अधिक निधी गोळा करता येऊ शकतो.
SBI आणि SBI म्युच्युअल फंड यांनी संयुक्तपणे जन प्रवेश एसआयपी योजना सुरू केली आहे. ही योजना विशेषता ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी उपयुक्त आहे. या योजनेत ₹250 इतक्या कमी रकमेपासून सुरुवात करता येते आणि गुंतवणूकदारांना दैनंदिन, साप्ताहिक, तसेच मासिक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.
SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एक प्रभावी पर्याय आहे. या योजनेत SBI च्या Balanced Advantage Fund मध्ये गुंतवणूक केली जाते, जिथे फंड मॅनेजर्स हे इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये संतुलित गुंतवणूक करतात.
जर तुम्ही ३० वर्षांसाठी दरमहा ₹250 गुंतवले आणि १५% सरासरी वार्षिक परतावा मिळाला, तर तुम्ही ₹१७.३० लाख जमा करू शकता. यामध्ये ₹९०,००० ही तुमची जमा रक्कम आणि ₹१६,६२,४५५ हा परतावा असेल. जर तुम्ही ४० वर्षांसाठी ही गुंतवणूक सुरू ठेवली, तर ₹७८.५० लाखांहून अधिक निधी जमा करू शकता. यामध्ये ₹१.२० लाख ही एकूण जमा रक्कम आणि ₹७७,३०,९३९ हा परतावा असेल.
ही योजना गुंतवणुकीचा सल्ला देण्यासाठी नसून केवळ माहितीपर आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखीम असलेली असते, त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे.
SBI ची ही नवीन योजना छोट्या बचतीतून मोठी संपत्ती निर्माण करण्याची उत्तम संधी देते. नियमित गुंतवणूक आणि संयम ठेवल्यास, भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळवणे सहज शक्य आहे. तुमच्या बचतीला दिशा देण्यासाठी ही योजना निश्चितच उपयुक्त ठरू शकते.
( Disclaimer : यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक
आहे. )