मंडळी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे, जी आपल्या ग्राहकांना सुलभ अटींवर वैयक्तिक कर्ज सुविधा उपलब्ध करून देते. या कर्जाच्या मदतीने ग्राहक आपल्या व्यवसायाची वाढ करू शकतात किंवा इतर वैयक्तिक गरजा पूर्ण करू शकतात. SBI कडून कर्ज घेतल्यास तुम्हाला इतर कुठूनही कर्ज घेण्याची गरज भासणार नाही, कारण येथे कर्जासाठी व्याजदर तुलनेत कमी असतो आणि परतफेडीसाठी ठराविक कालावधी दिला जातो.
SBI वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला या कर्जाचे व्याजदर, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यांची माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचण आल्यास उपयोगी पडेल.
सर्वसामान्यपणे जेव्हा कोणी कर्ज घेण्यासाठी बँकेत जातो, तेव्हा सर्वात पहिला प्रश्न हा असतो की कर्जावर किती टक्के व्याज लागेल. म्हणूनच SBI कडून कर्ज घेण्यापूर्वी त्याचे व्याजदर तपासणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला SBI कडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर खालील कागदपत्रांची तयारी करावी लागते.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पगाराची स्लिप (जर लागू होत असेल)
- निवासाचा पुरावा
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
– सर्वप्रथम, सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्र करून
– त्यांची फाईल तयार करा.
- त्यानंतर जवळच्या SBI शाखेत भेट द्या.
- तिथे कर्मचाऱ्यांना तुम्हाला वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचा आहे हे सांगा.
- ते तुम्हाला अर्जाचा फॉर्म देतील, जो काळजीपूर्वक वाचावा आणि भरावा लागतो.
- सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती फॉर्मसोबत जोडाव्यात.
- फॉर्मवर आवश्यक त्या ठिकाणी सही करून तो बँकेत जमा करावा लागतो.
- बँकेचे कर्मचारी फॉर्म तपासतील आणि तुम्ही पात्र असाल तर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.
अधिक माहिती आणि अर्जासाठी SBI ची अधिकृत वेबसाईट आहे.
https://sbi.co.in/web/business/information/interest-rates