मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच काही मोठी कारवाई केली आहे. देशातील पाच बँकांनी नियम तोडल्यामुळे त्यांच्या वर दंड ठोठावण्यात आले आहेत. ही बातमी ऐकून काही खातेदार चिंतेत पडू शकतात, पण घाबरण्याचं काहीही कारण नाही. कारण आरबीआयने स्पष्ट केलंय की या दंडाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार नाही. तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
या बँकांमध्ये ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि IDBI बँक यांचा समावेश आहे. प्रत्येक बँकेनं वेगवेगळ्या प्रकारचे नियम पाळले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.
ICICI बँकेवर जवळपास ९९ लाखांचा दंड लागलाय. या बँकेनं KYC प्रक्रिया, सायबर सुरक्षा आणि क्रेडिट कार्ड वापराबाबत काही नियम मोडले होते. बँक ऑफ बडोदा यांच्यावर ६१ लाखांहून अधिक दंड झाला, कारण ग्राहक सेवा आणि बँकिंगमध्ये काही त्रुटी होत्या.
अॅक्सिस बँकेला सुमारे ३० लाखांचा दंड झाला, कारण बँकेच्या आतल्या खात्यांची नीट व्यवस्था केली नव्हती. बँक ऑफ महाराष्ट्रलाही तितकाच दंड बसलाय, कारण KYC मध्ये चुक झाली होती. IDBI बँकेने कृषी कर्जासाठी असलेल्या सवलतीच्या योजनांमध्ये नियम न पाळल्यामुळे त्यांनाही दंड भरावा लागला.
ही कारवाई बँकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना जबाबदार बनवण्यासाठी केली जाते. यातून खातेदारांना कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि गरज असल्यास अधिकृत बँक किंवा आरबीआयच्या संकेतस्थळावरून माहिती घ्या.
अलीकडे आरबीआयने सहकारी बँकांवरही कडक पावले उचलली आहेत. काही बँकांचे लायसन्ससुद्धा रद्द झाले आहेत. हे सगळं देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आणि सामान्य लोकांच्या हितासाठीच केलं जातंय.
आरबीआयने आधीही सांगितलंय की सर्व बँकांनी नियम पाळायला हवेत. नियम मोडले तर कारवाई होणारच. त्यामुळे बँकांनी आपली अंतर्गत व्यवस्था सुधारली पाहिजे, असं स्पष्ट संकेत आरबीआयने दिला आहे.