मंडळी पोस्ट ऑफिस केवळ पत्रव्यवहार आणि पार्सल सेवांपुरते मर्यादित नाही तर ते विविध फायदेशीर गुंतवणूक योजनाही ऑफर करते. यातील पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (MIS) ही एक लोकप्रिय योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळू शकते.
या योजनेत किमान 1,000 रुपये ते जास्तीत जास्त 9 लाख रुपये (एकल खाते) किंवा 15 लाख रुपये (संयुक्त खाते) गुंतवणूक करता येते.
सध्या या योजनेवर 7.4% वार्षिक व्याजदर आहे जे मासिक पद्धतीने खात्यात जमा होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा सुमारे 5,550 रुपये व्याज मिळेल. ही योजना 5 वर्षांच्या कालावधीसाठी असून या कालावधीत तुम्हाला एकूण 3,33,000 रुपये व्याज मिळू शकते.
याशिवाय, कालावधी पूर्ण झाल्यावर तुमची मूळ गुंतवणूक रक्कमही परत मिळते. ही योजना विशेषता निवृत्तीवेतनधारकांसाठी आणि स्थिर उत्पन्नाची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.