मित्रांनो अलीकडे रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. यानंतर जवळपास सर्वच बँकांनी त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. मात्र पोस्ट ऑफिसने मात्र आपल्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे अजूनही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगला आणि स्थिर परतावा मिळत आहे.
पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना, म्हणजेच टाईम डिपॉझिट (TD Scheme), ही बँकांच्या एफडी योजनेप्रमाणेच आहे. या योजनेत ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवल्यानंतर निश्चित व्याजदराने परतावा मिळतो. सध्या पोस्ट ऑफिस १ वर्षासाठी ६.९ टक्के, २ वर्षांसाठी ७ टक्के, ३ वर्षांसाठी ७.१ टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५ टक्के व्याज देत आहे. या योजनेत सर्व ग्राहकांना, मग ते पुरुष असोत की महिला, ज्येष्ठ नागरिक असोत की सामान्य नागरिक – सर्वांना समान व्याज दर लागू होतो.
उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर २ वर्षांसाठी १ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीअखेर तुम्हाला एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील. यामध्ये मूळ रक्कम १ लाख आणि व्याजरुपात मिळणारे १४,८८८ रुपये यांचा समावेश आहे.
पोस्ट ऑफिसच्या बचत योजना पूर्णपणे सुरक्षित आहेत, कारण या योजना केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालवल्या जातात. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता स्थिर परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत योजना हा एक विश्वसनीय पर्याय ठरतो.