मंडळी पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण सरकार त्यावर हमी देते. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करताना कोणताही धोका नसतो.
पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम (SCSS) ही योजना निवृत्त नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत ५५ वर्षांपेक्षा जास्त आणि ६० वर्षांखालील निवृत्त कर्मचारी गुंतवणूक करू शकतात. याशिवाय, ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले आणि ६० वर्षांखालील निवृत्त संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी देखील या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. मात्र दोघांसाठी अट अशी आहे की, निवृत्तीचे लाभ मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
या योजनेवर सध्या ८.२ टक्के दराने व्याज दिले जाते. किमान १,००० रुपये आणि कमाल ३० लाख रुपये गुंतवता येतात. जर कोणी ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्याला वर्षाला सुमारे २.४६ लाख रुपये व्याज मिळते, जे दरमहा जवळपास २०,००० रुपये इतके होते. व्याज दर तीन महिन्यांनी — एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये — खातेदाराच्या खात्यात जमा होते.
जर मुदतपूर्तीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला, तर खाते बंद करून त्यातील रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते.
SCSS ही योजना केवळ सुरक्षित नाही, तर बँक एफडीच्या तुलनेत अधिक परतावा देणारी योजना आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याज कमी केल्यामुळे ही योजना अधिक आकर्षक ठरते.
याशिवाय ही योजना करसवलतीसाठीही उपयुक्त आहे. प्राप्तिकर कायद्यातील कलम ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.