मंडळी प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश लहान व्यापाऱ्यांना, फेरीवाल्यांना आणि स्वयंपूर्ण होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत करून त्यांचा व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी मदत करणे आहे.
या योजनेअंतर्गत सरकार १०,००० रुपयांपासून सुरुवातीचे कर्ज देते. हे कर्ज वेळेत परतफेड केल्यास पुढच्या टप्प्यात २०,००० आणि नंतर ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जासाठी कोणतीही हमी किंवा गॅरंटर आवश्यक नाही. विशेष बाब म्हणजे हे कर्ज घेताना तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. आधार हे तुमचं ओळखपत्रच नव्हे तर आर्थिक मदतीसाठी उपयुक्त कागदपत्र देखील ठरते.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यवसायाची माहिती आणि बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो. अर्ज केल्यानंतर अधिकृत कर्मचारी तुमच्या व्यवसायाची माहिती तपासतील आणि सर्वकाही योग्य असल्यास तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाईल.
या योजनेत आणखी एक फायदेशीर गोष्ट म्हणजे जर तुम्ही डिजिटल व्यवहार केले, तर त्यावर कॅशबॅकही मिळतो. त्यामुळे सरकार डिजिटल व्यवहारांनाही प्रोत्साहन देते.
स्वनिधी योजना ही विशेषता अशा लोकांसाठी आहे जे स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना सुरुवात करता येत नाही. ही योजना त्यांच्यासाठी आर्थिक हातभार ठरू शकते.