नमस्कार मित्रांनो आजच्या डिजिटल काळात कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना बँक व वित्तीय संस्था सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर तपासतात. जितका स्कोर चांगला, तितक्या चांगल्या अटींवर कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. मात्र अनेकदा लोनसाठी केलेल्या विचारणा म्हणजेच इन्क्वायरीमुळे स्कोरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी हार्ड इन्क्वायरी आणि सॉफ्ट इन्क्वायरी यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे.
हार्ड इन्क्वायरी म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता, तेव्हा संबंधित बँक किंवा संस्था तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासते. ही प्रक्रिया हार्ड इन्क्वायरी म्हणून ओळखली जाते.
यावेळी जर तुम्ही याआधी कधी वेळेवर ईएमआय भरला नसेल, तर त्याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोरवर होतो. हार्ड इन्क्वायरीची नोंद सुमारे २ वर्षांपर्यंत क्रेडिट रिपोर्टमध्ये राहते.
सॉफ्ट इन्क्वायरी म्हणजे काय?
जर तुम्ही फक्त तुमचा स्वतःचा क्रेडिट स्कोर तपासत असाल, किंवा बँकेने तुम्हाला प्री-अप्रुव्ह्ड ऑफर दिला असेल, तर त्या वेळी सॉफ्ट इन्क्वायरी होते. अशा प्रकारच्या विचारणीत तुमच्या क्रेडिट स्कोरवर कसलाही नकारात्मक परिणाम होत नाही.
अनेक हार्ड इन्क्वायरी टाळा
जर तुम्ही एका वेळेस अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला, तर प्रत्येक वेळी हार्ड इन्क्वायरी होते. यामुळे तुम्ही आर्थिक संकटात आहात, असा समज बँकेला होऊ शकतो आणि स्कोर घटतो.
त्यामुळे एकाच वेळी अनेक अर्ज करणे टाळा. अर्ज करताना योग्य अंतर ठेवा आणि फक्त गरज असेल तेव्हाच अर्ज करा.
क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी उपाय
जर हार्ड इन्क्वायरीमुळे तुमचा स्कोर कमी झाला, तरी काळजी करण्याची गरज नाही.
वेळेवर EMI भरणे, क्रेडिट लिमिटचे योग्य प्रमाणात वापर (क्रेडिट युटिलायझेशन कमी ठेवणे) आणि थकबाकी न ठेवणे यामुळे स्कोर काही महिन्यांत पुन्हा सुधारू शकतो.
कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. इन्क्वायरीचे प्रकार समजून घेतल्यास तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुरक्षित ठेवू शकता आणि भविष्यातील आर्थिक निर्णय अधिक सक्षमपणे घेऊ शकता.