मंडळी केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत केली जाते.केंद्र सरकार व एलआयसीने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांना रोजगाराचीही संधी उपलब्ध होत असते. एलआयसी विमा सखी योजनेत महिला दर महिन्याला ७००० रुपये मिळवू शकतात.
डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे.ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्त लाभ मिळणार आहे. विमा सखी योजनेत जवळपास १ लाख महिलांना जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट बनवले जाणार आहे.
ग्रामीण भागात विम्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची संधी यातून दिली जाईल. ही योजना भारतातील तळागळात पोहचली तर विमा योजनेबाबत जनजागृती होईल.
एलआयसी विमा सखी योजनेत १८ ते ७० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. १०वी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या महिलादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेत एका वर्षात १ लाख महिला तर तीन वर्षात २ लाख महिला विमा सखी योजनेत जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेत महिलांना विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन द्यायचे आहे. जर महिलांना विमा पॉलिसी विकली तर त्यांना त्याचे कमिशन मिळणार आहे. याचसोबत दर महिन्याला ठरावीक रक्कमदेखील दिली जाणार आहे.
या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात. पहिल्या वर्षी ७००० रुपये देतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दर महिन्याला ६००० रुपये दिले जातील. तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना विमा पॉलिसी वर कमिशनदेखील दिले जाते.
या योजनेत महिलांना ट्रेनिंग देखील दिले जाणार आहे. यामुळेच महिलांना दर महिन्याला रोजगार निर्माण होतो. या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. १०वी पास महिलांना या योजनेत काम करण्याची संधी मिळणार आहे.