मित्रांनो एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ हे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विमा योजना उपलब्ध करून देते. त्यापैकी एक महत्त्वाची आणि विशेष योजना म्हणजे जीवन शिरोमणी योजना. ही योजना विशेषता अशा लोकांसाठी आहे, ज्यांचे उत्पन्न चांगले असून, गुंतवणुकीसोबतच सुरक्षेचाही त्यांना विचार असतो.
जीवन शिरोमणी योजना ही नॉन-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे. या योजनेत फक्त चार वर्षे प्रीमियम भरावा लागतो. दरमहा अंदाजे ९४,००० रुपये प्रीमियम भरण्याची तरतूद आहे. ही रक्कम तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक या कोणत्याही प्रकारे भरू शकता.
या योजनेत किमान विमा रक्कम एक कोटी रुपये आहे. यामध्ये विमा रकमेच्या कमाल मर्यादेवर कोणतीही अडचण नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय १८ वर्षे असावे लागते. कालावधीवर आधारित कमाल वयोमर्यादा वेगवेगळी आहे. जर योजना १४ वर्षांची असेल, तर कमाल वय ५५ वर्षे आहे. १६ वर्षांच्या योजनेसाठी ५१ वर्षे, १८ वर्षांसाठी ४८ वर्षे आणि २० वर्षांच्या कालावधीसाठी कमाल वय ४५ वर्षे आहे.
या योजनेत कर्जाचीही सुविधा उपलब्ध आहे. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व प्रीमियम भरल्यानंतर, काही अटींवर ग्राहक कर्ज घेऊ शकतो. पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर आधारित हे कर्ज दिले जाते आणि ते LIC ने ठरवलेल्या व्याजदरावर असते.
पॉलिसीधारकाला गंभीर आजाराचे निदान झाल्यास, विम्याच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम एकरकमी दिली जाते. तसेच पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना काही निश्चित लाभ दिले जातात.
ज्यांना मोठ्या रकमेची गुंतवणूक करायची आहे आणि भविष्य सुरक्षित ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरू शकते. कारण फक्त चार वर्षे प्रीमियम भरल्यानंतर, त्यांना एक कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते.
LIC च्या इतर योजनांप्रमाणेच, ही योजना देखील सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा देते. त्यामुळे भविष्यासाठी शाश्वत आर्थिक आधार शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जीवन शिरोमणी योजना एक उत्तम पर्याय ठरतो.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी LIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता – https://licindia.in