मित्रांनो कामकाजाच्या काळात दर महिन्याला पगार खात्यावर जमा होत असल्याने आर्थिक अडचणी फारशा भासत नाहीत. मात्र निवृत्तीनंतर पगार येणं थांबतं आणि नियमित उत्पन्नाचा स्रोत बंद होतो. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
ही योजना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता प्रदान करते. फक्त एकदाच गुंतवणूक केल्यानंतर, दरमहा निश्चित रक्कम तुमच्या खात्यात जमा होत राहते. त्यामुळे आर्थिक चिंता दूर होते आणि निवृत्त जीवन अधिक आनंदी होते.
कोण करू शकतो गुंतवणूक?
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा ३० वर्षे ते ८५ वर्षे आहे.
ही एक सिंगल प्रीमियम, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग वैयक्तिक वार्षिकी योजना आहे.
यामध्ये एकदाच रक्कम भरल्यावर, तुम्हाला ठरलेल्या पद्धतीनुसार (मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक) पेन्शन मिळते.
तुम्ही ही पॉलिसी स्वतःसाठी किंवा दोघांसाठी (जॉइंट लाईफ) घेऊ शकता. त्यामुळे दोघांनाही आयुष्यभर नियमित उत्पन्न मिळते.
किती मिळू शकते पेन्शन?
- किमान गुंतवणूक रक्कम१ लाख रुपये
- कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.
- उदाहरणार्थ १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दरवर्षी सुमारे १२,००० रुपये पेन्शन मिळू शकते.
- जर दरमहा सुमारे २०,००० रुपये पेन्शन हवे असेल, तर सुमारे ४०.७२ लाख रुपये गुंतवावे लागतील.
जीवन अक्षय पॉलिसीचे फायदे
- एकदाच प्रीमियम भरावा लागतो.
- निवृत्तीनंतर आयुष्यभर निश्चित उत्पन्नाची हमी.
- बाजारातील चढ-उतारांचा पॉलिसीवर कोणताही परिणाम होत नाही.
- एकट्याच्या किंवा दोघांच्या जीवनासाठीही उत्पन्नाची सोय.
- आर्थिक स्थैर्य व निवृत्त जीवनात आर्थिक निर्भयता.