मित्रांनो भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने नागरिकांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना एकदाच गुंतवणूक करायची संधी देते आणि आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो. एकल (Single) आणि संयुक्त (Joint) अशा दोन्ही स्वरूपात ही योजना उपलब्ध आहे.
ही योजना निवृत्तीनंतर तात्काळ पेन्शन देण्याची सुविधा देते. संयुक्त योजनेंतर्गत, एका व्यक्तीच्या निधनानंतर दुसऱ्या व्यक्तीला पेन्शन मिळत राहते.
स्मार्ट पेन्शन योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन घेण्याचा पर्याय आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला देखील या योजनेचा लाभ मिळतो.
ही योजना एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करता येते किंवा एलआयसी एजंट, पीओएसपी-लाइफ इन्शुरन्स आणि कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटरद्वारे ऑफलाइनही खरेदी करता येते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय १८ वर्षे असावे. कमाल वय ६५ ते १०० वर्षांपर्यंत ठेवण्यात आले आहे, जे निवडलेल्या अन्युइटी पर्यायावर अवलंबून असते.
पेन्शन घेण्यासाठी दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. सिंगल लाइफ अन्युइटी अंतर्गत पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते. जॉइंट लाइफ अन्युइटीमध्ये पती-पत्नी दोघांनाही पेन्शन मिळत राहते आणि एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला याचा लाभ मिळतो.
सध्याच्या एलआयसी पॉलिसीधारकांसाठी तसेच त्यांच्या नॉमिनी आणि लाभार्थ्यांसाठी हायर अन्युइटी रेटचा फायदा मिळतो. याशिवाय काही अटींसह पूर्ण किंवा अंशतः रक्कम काढण्याचाही पर्याय आहे, ज्यामुळे आर्थिक लवचिकता मिळते.
या योजनेत किमान ₹1 लाख गुंतवणूक करावी लागते. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणुकीच्या रकमेवरच पेन्शनची रक्कम ठरते.
जर तुम्ही मासिक पेन्शन घ्यायची निवड केली, तर किमान ₹1000 पेन्शन मिळू शकते. त्रैमासिक पेन्शनसाठी किमान ₹3000, सहामाही पेन्शनसाठी ₹6000 आणि वार्षिक पेन्शनसाठी किमान ₹12,000 पेन्शन मिळते.
एलआयसी स्मार्ट पेन्शन योजना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करते. यामुळे तुमचं भविष्य अधिक सुरक्षित आणि चिंता-मुक्त होऊ शकतं.