नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही मर्यादा 3 लाख रुपये होती.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी बियाणं, रासायनिक खते, कीटकनाशके आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी कर्ज घेऊ शकतात. याशिवाय, पीक काढणीच्या वेळीदेखील हे कार्ड उपयोगी पडते.
2019 पासून किसान क्रेडिट कार्डमध्ये पशूपालन, डेअरी आणि मत्स्यपालन यांसारख्या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते.
31 डिसेंबर 2024 पर्यंत किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे. याचा लाभ 7.72 कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे. तुलनेने, 2014 मध्ये ही कर्जरक्कम 4.26 लाख कोटी रुपये होती.
याशिवाय केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 275 टक्क्यांची कपात करून ते 1.37 लाख कोटी रुपये केले आहे. पण मत्स्यपालन, पशूपालन आणि डेअरी क्षेत्रासाठी 37 टक्क्यांनी निधी वाढवून 7,544 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 4,364 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.