मंडळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे बिनव्याजी कर्ज योजना. ही योजना मुख्यता तरुणांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी राबवली जाते. अनेक वेळा भांडवलाच्या अभावामुळे व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही. अशा वेळी ही योजना आर्थिक मदतीसाठी उपयुक्त ठरते. राज्य सरकारकडून तरुण-तरुणींना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जात असून, या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय सुरू करता येतो.
ही योजना 1998 साली महाराष्ट्र सरकारने सुरू केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी मदत करण्याच्या हेतूने करण्यात आली. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज परतावा योजना आणि गट कर्ज योजना राबवल्या जातात. या योजनांमधून मराठा समाजातील तरुणांना उद्योग सुरू करण्याची संधी मिळते. तसेच, व्यवसायिक या कर्जाच्या मदतीने वाहन खरेदी करण्याचा लाभही घेऊ शकतात.
वैयक्तिक कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. हे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीत परतफेड करावे लागते. पहिला हप्ता अनुदान स्वरूपात असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे, महिलांसाठी वयोमर्यादा 55 वर्षे आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यापूर्वी जर लाभार्थ्याने कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर या योजनेसाठी तो पात्र ठरत नाही.
गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, नोंदणीकृत संस्था, कंपन्या इत्यादींना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाची परतफेड कालावधी पाच वर्षांची असते आणि व्याजदर शासन ठरवते.
कार खरेदीसाठीही ही योजना उपयुक्त आहे. अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा 55 वर्षांपर्यंत असून, अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेचा लाभ एका व्यक्तीस फक्त एकदाच मिळतो.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://udyog.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते. नंतर कर्जासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अर्जात वैयक्तिक माहिती, पत्ता, आधार क्रमांक, शैक्षणिक माहिती, मोबाईल क्रमांक व उत्पन्न तपशील भरावा लागतो. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला समाविष्ट आहे. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा आणि त्यानंतर अर्जाची स्थिती संकेतस्थळावर तपासता येते.
या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांचे व्यवसायाचे स्वप्न साकार करण्यासाठी आधार देणे आणि बेरोजगारीवर मात करणे हा आहे. ही योजना म्हणजे तरुणांच्या कल्पनांना वास्तवात आणण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.