आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाला 3 मार्च 2025 रोजी 25 वर्षे पूर्ण झाली. हा फंड 3 मार्च 2000 रोजी सेक्टोरल टेक्नॉलॉजी कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आला होता. गुंतवणूकदारांच्या विश्वासावर आणि 25 वर्षांच्या कामगिरीवर खरा उतरत विविध टप्प्यांत बेंचमार्कला मागे टाकत गुंतवणूकदारांना उच्च परतावा दिला आहे.
ज्यांनी लाँचिंगच्या वेळी एकरकमी गुंतवणूक केली त्यांच्यासाठी या योजनेने सुमारे १३ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे. तसेच , एसआयपीवरील परतावा आणखी चांगला झाला आहे. या फंडातील एसआयपी गुंतवणूकदारांचे पैसे २५ वर्षांत वार्षिक १८.५२ टक्के दराने वाढले आहेत.
या फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला ?
- 1 वर्षाचा परतावा – 18.08%
- 1 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य – 1,18,131 रुपये
- 3 वर्षाचे वार्षिक परतावा – 9.87%
- 3 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य – 132660 रुपये
- 5 वर्षाचे वार्षिक परतावा – 28.04%
- 5 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य 344539 रुपये
- लाँच पासून वार्षिक परतावा – सुमारे 13 टक्के
- वार्षिक परतावा – 12.98 टक्के
- लाँच पासून 1 लाख रुपयांची किंमत – 20,97,900 रुपये
फंडाने SIP गुंतवणुकीवर किती परतावा दिला ?
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाच्या एसआयपी कामगिरीमुळे एसआयपी गुंतवणूकदारांना 25 वर्षांत वार्षिक 18.52 टक्के परतावा मिळाला आहे.
या फंडाने दरमहा 3000 रुपयांच्या एसआयपीच्या गुंतवणुकीचे रूपांतर 25 वर्षांत 1.47 कोटी रुपये इतके केले आहे. ही आकडेवारी व्हॅल्यू रिसर्चवर उपलब्ध आहे.
Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.