मंडळी आजकाल कर्ज घेणं एक सामान्य बाब बनली आहे, पण कर्जाच्या हप्त्यांची वेळेवर फेडणी अत्यंत महत्त्वाची आहे. हप्ता चुकल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे, कर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणं आवश्यक आहे.
पॅन कार्ड वापरून कर्जाची स्थिती कशी तपासावी?
1) क्रेडिट ब्युरो वेबसाइट्स
CIBIL, Experian, CRIF High Mark आणि Equifax यांसारख्या क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटवर पॅन कार्ड आणि आवश्यक माहिती भरून तुमचा क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड करू शकता.
2) फिनटेक एप्स
Paytm, CRED, BankBazaar यासारख्या एप्सचा वापर करून तुम्ही सहजपणे तुमचं क्रेडिट स्कोअर आणि कर्जाची स्थिती तपासू शकता.
3) बँकेचे एप
तुमच्या बँकेच्या एपमध्ये Loan Account किंवा Credit Section पर्यायावर क्लिक करून कर्जाची स्थिती तपासता येते.
क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी उपाय
लवकर हप्ते भरा — कर्जाचा हप्ता लवकर फेडा, त्यामुळे व्याज कमी होईल आणि क्रेडिट स्कोअर सुधारेल.
EMI मध्ये कर्ज फेडा — मोठ्या थकबाकीसाठी EMI मध्ये परतफेड करा.
अतिरिक्त उत्पन्नाचा वापर करा — बोनस किंवा बचत वापरून कर्ज फेडा.
क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा — क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरल्यामुळे क्रेडिट स्कोअर सुधारते.
कर्जाची स्थिती तपासणं आणि वेळेवर हप्ते फेडणं महत्त्वाचं आहे. पॅन कार्डाच्या मदतीने तुम्ही क्रेडिट रिपोर्ट सहज तपासू शकता आणि तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. आर्थिक जागरूकतेने भविष्यात कर्ज घेण्यात अडचणी टाळू शकता.