नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवीन आर्थिक वर्षात सरकारने TDS विषयी नवीन निर्णय घेतला आहे. याबद्दल अधिक माहिती आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.
नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सरकारने कर नियमांमध्ये खूप जास्त बदल केले आहेत. याचा सर्वसामान्य नागरिक व गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.
फिक्स्ड डिपॉझिट (FD) गुंतवणूकदारांसाठी टीडीएस (TDS) नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात मुदत ठेवींवरील (Fixed Deposit Interest) कर कपातीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती.
या निर्णयामुळे लहान गुंतवणूकदार व ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
टीडीएस मर्यादा वाढवली, सामान्य नागरिकांना होणार फायदा
आतापर्यंत, सामान्य करदात्यांसाठी (General Taxpayers) एफडीवरील व्याजावर टीडीएस कपात करण्याची मर्यादा ४०,००० रुपये होती. मात्र, १ एप्रिल २०२५ पासून ही मर्यादा वाढवून ५०,००० रुपये इतकी करण्यात आली आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराचे एफडीवर मिळणारे वार्षिक व्याज ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्यावर टीडीएस कपात केली जाणार नाही.
तर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली , माहिती आवडल्यास आपल्या इतर ग्रुप वर शेअर नक्की करा.