कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बदलले दोन नियम …….

By Pramod

Published on:

Follow Us
epfo changes 2 rules

मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने खाते हस्तांतरणाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या सुधारित नियमांमुळे आता कर्मचार्‍यांना पैसे काढताना किंवा पीएफ खाते हस्तांतरित करताना कोणतीही अडचण येणार नाही. अंदाजे 1.25 कोटींहून अधिक सदस्यांना या निर्णयाचा थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंत नोकरी बदलल्यावर कर्मचाऱ्यांना खाते हस्तांतरणासाठी कंपन्याची मंजुरी घ्यावी लागत असे, ज्यामुळे अनेक अडचणी येत असत. मात्र, जानेवारी 2025 पासून लागू होणाऱ्या नव्या नियमांनुसार, बहुतेक हस्तांतरण प्रकरणांमध्ये कंपनीच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही.

नवीन प्रक्रियेअंतर्गत, एकदा हस्तांतरणाचा दावा सोर्स ऑफिस कडून मंजूर झाला की, संबंधित रक्कम थेट डेस्टिनेशन ऑफिस मधील कर्मचाऱ्याच्या नव्या खात्यात आपोआप जमा केली जाईल. यामुळे पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे.

तसेच नवीन प्रणालीद्वारे पीएफ बचतीतील करपात्र (Taxable) आणि करमुक्त (Non-Taxable) रकमेचीही स्पष्ट माहिती दिली जाईल, ज्यामुळे टीडीएस (TDS) अचूकपणे वसूल केला जाऊ शकेल.

याशिवाय EPFO ने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे — आता युएएन (Universal Account Number) तयार करताना आधार कार्ड तत्काळ लिंक करणे बंधनकारक नसेल. या सुधारणा लागू झाल्याने दरवर्षी सुमारे 90 हजार कोटी रुपयांचा पीएफ निधी लवकर आणि अचूकपणे हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या गुंतवणूक,कर्ज,बँकिंग हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.