नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत महागाई भत्ता मध्ये जी वाढ करण्यात आली आहे. ती आता राज्यातील कर्मचारी यांना सुद्धा दिली जाणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.
मागील महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% करण्यात आला असून मार्च महिन्यात जरी याचा निर्णय झाला असला तरी सुद्धा हे महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे.
संबंधित केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वितरित करण्यात आलेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% झाला असून जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा त्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची आगामी महागाई भत्ता वाढ होण्याआधीच देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारांकडून तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित केला जात आहे.
आतापर्यंत राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश मधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आसाम राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील तेथील सरकारकडून वाढवण्यात आला आहे, आता मध्य प्रदेश मधील राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे मध्य प्रदेश मधील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या जवळपास सात ते साडेसात लाख राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकाच वेळी पाच टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय आज घेण्यात आला आहे.
यामुळे मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अक्षय तृतीयाच्या आधीच ही आनंदाची बातमी मिळाली आहे. महत्वाची बाब अशी की सदर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार असून संबंधितांना नऊ महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा भेटणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण तेथील राज्य सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला आहे ? महागाई भत्ता फरकाची रक्कम एकाच वेळी मिळणार की हप्त्यांमध्ये जमा होणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राजपत्रित अधिकारी संघटनेच्या प्रांतीय परिषदेत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे. डॉक्टर मोहन यादव यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलै 2024 पासून तीन टक्के आणि 1 जानेवारी 2025 पासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केलेली आहे.
मध्यप्रदेश राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकूण पाच टक्क्यांनी वाढला आहे. आता मध्यप्रदेशातील
सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 55% महागाई भत्ता दिला जाणार आहे. तेथील राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली असल्याने महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सुद्धा मिळणे अपेक्षित आहे दरम्यान ही रक्कम जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या काळात पाच समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाणार आहे.
यामुळे या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.