मंडळी तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहात का? जर हो, तर बँकेच्या पायऱ्या चढण्यापूर्वी CIBIL स्कोरबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
बँक कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी अर्जदाराची आर्थिक स्थिरता आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता तपासते. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे CIBIL स्कोर. जर तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल, तर तुम्हाला कर्ज सहज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते.
CIBIL स्कोर किती असावा?
CIBIL स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा स्कोर जितका जास्त असेल तितकी बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
- 750 किंवा त्यापेक्षा अधिक स्कोर – कर्ज मंजुरीसाठी आदर्श.
- 600 ते 750 स्कोर – कर्ज मिळू शकते, पण व्याजदर जास्त लागू शकतो.
- 300 ते 600 स्कोर – खराब स्कोर मानला जातो; कर्ज मिळण्याची शक्यता कमी असते.
CIBIL स्कोर कसा सुधारावा?
1) नवीन कर्जासाठी वारंवार अर्ज करू नका – सतत नवीन कर्जासाठी अर्ज केल्यास क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
2) क्रेडिट रिपोर्ट नियमित तपासा – तुमच्या क्रेडिट अहवालात चुका असतील तर त्या त्वरित दुरुस्त करा.
3) क्रेडिट कार्ड मर्यादेचे नियोजन करा – एकूण क्रेडिट लिमिटच्या 30% पेक्षा जास्त वापर करू नका.
4) कर्जाचे हफ्ते वेळेवर भरा – कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते वेळेवर न भरल्यास स्कोरवर नकारात्मक परिणाम होतो.
5).क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरा – उशिरा भरलेले बिल क्रेडिट स्कोअर कमी करू शकते.
6) जुन्या कर्जाचे प्राधान्याने परतफेड करा – उच्च व्याजदर असलेल्या कर्जांची परतफेड लवकर करा.
CIBIL स्कोर तपासण्याची प्रक्रिया
1) CIBIL च्या अधिकृत वेबसाइटवर जा https://www.cibil.com
2) तुमची माहिती भरा आणि KYC पडताळणी पूर्ण करा.
3) तुमचा CIBIL स्कोर आणि क्रेडिट अहवाल डाउनलोड करा.
CIBIL स्कोर हा कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 750 पेक्षा जास्त स्कोर असेल तर कर्ज सहज मंजूर होते आणि व्याजदरही तुलनेने कमी लागतो. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोर सुधारण्यासाठी योग्य आर्थिक शिस्त पाळा आणि तुमचे आर्थिक आरोग्य मजबूत करा.