मंडळी बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी CIBIL स्कोअर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. CIBIL स्कोअर म्हणजे तुमच्या आर्थिक शिस्तीचे आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेचे प्रतिबिंब. जर तुमचा स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला सहज कर्ज मिळते आणि कमी व्याजदराचा लाभ होतो.
कर्जासाठी आवश्यक CIBIL स्कोअर
सामान्यता 750 किंवा त्यापेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेले अर्जदार बँकांना अधिक विश्वासार्ह वाटतात. त्यामुळे, 750+ स्कोअर असेल, तर तुम्हाला कर्ज सहज मिळते आणि चांगल्या अटींवर मंजुरी मिळते. जर तुमचा स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा व्याजदर अधिक लागू शकतो.
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी उपयुक्त मार्ग
1 ) कधी कधी चुकीची माहिती किंवा जुन्या चुका CIBIL स्कोअर कमी होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे, तुमच्या क्रेडिट रिपोर्टची नियमित तपासणी करा आणि कोणतीही चूक आढळल्यास तातडीने CIBIL कडे तक्रार करा.
2) कर्जाच्या EMI आणि क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे आवश्यक आहे. विलंब झाल्यास CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो आणि बँक तुम्हाला कमी विश्वासार्ह मानते.
3) तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त रक्कम खर्च करणे टाळा. उदाहरणार्थ जर तुमची क्रेडिट लिमिट ₹1,00,000 असेल, तर ₹30,000 पेक्षा जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्या.
4) जर तुमच्याकडे अनेक कर्जे असतील, तर सर्वप्रथम जास्त व्याजदर असलेली कर्जे फेडा. यामुळे एकूण कर्जाचा भार कमी होईल आणि CIBIL स्कोअर सुधारण्यास मदत होईल.
5) सतत नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास CIBIL स्कोअर कमी होतो. बँकांना वाटते की तुम्हाला सतत पैशांची गरज आहे आणि तुम्ही आर्थिक संकटात आहात. त्यामुळे फक्त गरजेप्रमाणेच नवीन कर्जासाठी अर्ज करा.
6) जर तुमचा CIBIL स्कोअर खूप कमी असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट (FD) आधारित क्रेडिट कार्ड घ्या. याला Secured क्रेडिट कार्ड म्हणतात. हे वापरल्याने हळूहळू CIBIL स्कोअर सुधारता येतो.
7) तुमची जुनी क्रेडिट कार्डे किंवा लोन अकाउंट चांगल्या स्थितीत असतील, तर ती बंद करू नका. जास्त काळपर्यंत चांगला क्रेडिट इतिहास ठेवण्याने तुमचा CIBIL स्कोअर सुधारतो.
CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी किती वेळ लागतो?
जर तुम्ही वरील सर्व उपाय नियमितपणे केले, तर 3 ते 6 महिन्यांत तुमच्या CIBIL स्कोअरमध्ये सुधारणा दिसू लागेल. पण मोठ्या चुका सुधारण्यासाठी कधी कधी 6 ते 12 महिने लागू शकतात. त्यामुळे संयम ठेवा आणि आर्थिक शिस्त पाळा.
CIBIL स्कोअर हा बँकेकडून कर्ज मंजुरी मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 750+ स्कोअर असल्यास कर्ज सहज मिळते, तर कमी स्कोअर असल्यास अडचणी येऊ शकतात. पण घाबरण्याची गरज नाही. योग्य आर्थिक नियोजन, वेळेवर EMI भरणे, क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर आणि जुने कर्ज वेळेवर फेडणे या उपायांनी तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर सुधारू शकता.
तुमच्या CIBIL स्कोअरची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://www.cibil.com ला भेट देऊ शकता.