मंडळी आजकाल अनेक लोक आपल्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतात. या प्रकारच्या कर्जासाठी फारशी कागदपत्रांची गरज नसते. काही मूलभूत दस्तऐवजांच्या आधारे बँका किंवा वित्तीय संस्था तुमचं क्रेडिट स्कोअर तपासून तुम्हाला कर्ज देतात.
ईएमआय थकवल्यास काय होते?
कधी कधी आर्थिक अडचणीमुळे कर्जाची परतफेड वेळेत होऊ शकत नाही. अशा वेळी बँका किंवा संस्था रिकव्हरी एजंट मार्फत कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या प्रक्रियेत अनेकदा वसुली एजंटांकडून गैरवर्तन, मानसिक दबाव आणि अयोग्य भाषेचा वापर केल्याच्या तक्रारी ऐकू येतात.
रिकव्हरी एजंट काय करू शकतो?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिकव्हरी एजंटसाठी काही स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
1) रिकव्हरी एजंट ग्राहकाच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ शकतो. मात्र यासाठी ठराविक वेळ मर्यादा असते. सकाळी ७ नंतर आणि रात्री ७ नंतर एजंट भेट देऊ शकत नाही.
2) कोणताही एजंट कर्जदारावर जबरदस्ती करू शकत नाही. धमकी देणे, अपमानास्पद भाषा वापरणे किंवा मानसिक दबाव टाकणे हे पूर्णपणे गैरकायदेशीर आहे.
3) कर्जदाराशी संवाद साधताना एजंटने सौम्य आणि समजूतदारपणे बोलणे आवश्यक आहे. लोन फेडण्याचे पर्याय समजावून सांगणे आणि सहकार्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे.
कर्ज घेणं ही काही चुकीची गोष्ट नाही, पण वेळेवर परतफेड न केल्यास कायदेशीर आणि नियमबद्ध प्रक्रियेनुसार वसुली केली जाते. रिकव्हरी एजंटकडून गैरवर्तन झाल्यास संबंधित बँक किंवा आरबीआयकडे तक्रार करता येते.