मंडळी सरकारी क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये मंगळवारी तीव्र घसरण नोंदवली गेली. यामध्ये पंजाब अँड सिंध बँक (PSB) चे शेअर्स २०% घसरले, तर युको बँक चे शेअर्स ७% पर्यंत खाली आले. ही घसरण बँकांनी अलीकडेच पूर्ण केलेल्या क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) च्या पार्श्वभूमीवर झाली आहे.
QIPमुळे बाजारात दबाव
- पंजाब अँड सिंध बँकेने १,२१९ कोटी रुपये गोळा करण्यासाठी QIP लाँच केला होता, ज्यामध्ये एलआयसी आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केले.
- त्याचप्रमाणे युको बँक नेही QIP पूर्ण केला असून, त्यातील बहुतांश शेअर्स एलआयसी-समर्थित फंडांना विकण्यात आले.
- CNBC-TV18 च्या अहवालानुसार, या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी QIPद्वारे एकूण ६,००० कोटी रुपये उभे केले, त्यातील २५% एलआयसीने गुंतवले.
सरकारी मालकी आणि MPS नियमांमुळे अडचण
सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी स्पष्ट केले आहे की, अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग (MPS) नियम पाळणे अजूनही आव्हानात्मक आहे. पंजाब अँड सिंध बँक मध्ये सरकारची मालकी डिसेंबर २०२४ पर्यंत ९८.२५% होती, ज्यामुळे शेअर बाजारातील तरलतेवर परिणाम झाला आहे.
बँक शेअर्सची कामगिरी
- पंजाब अँड सिंध बँक चा शेअर १९.२% घसरून ३५.२३ रुपये इतक्या निम्नस्तरावर पोहोचला, जो या बँकेचा ५२ आठवड्यातील सर्वात निचांक आहे.
- युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB), इंडियन बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक यांसारख्या इतर सरकारी बँकांचे शेअर्सही १-२% घसरले.
- बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा यांच्या शेअर्समध्येही मंदीची लाट दिसून आली.
गुंतवणूकदारांसाठी सूचना
सूचना — हा अहवाल केवळ शेअर बाजारातील घडामोडींवर आधारित आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.