मंडळी बहुतेक बँका त्यांच्या बचत खातेदारांकडून ठराविक रक्कम किमान शिल्लक म्हणून ठेवण्याची अट घालतात. जर ही रक्कम खात्यात ठेवली गेली नाही, तर बँका नॉन मेंटेनन्स शुल्क आकारतात. त्यामुळे खातेदारांनी आपल्या खात्यात दरमहा किमान किती रक्कम ठेवणे आवश्यक आहे, हे माहीत असणे गरजेचे आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या शहरी, मेट्रो आणि निमशहरी भागातील खातेदारांना किमान ₹2,000 शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही रक्कम ₹1,000 आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेट्रो व शहरी भागातील खातेदारांना ₹3,000, निमशहरी भागात ₹2,000, आणि ग्रामीण भागात ₹1,000 शिल्लक ठेवावी लागते.
एचडीएफसी बँकेमध्ये मेट्रो आणि शहरी शाखांतील ग्राहकांनी ₹10,000 शिल्लक राखावी लागते. निमशहरी भागासाठी ₹5,000 आणि ग्रामीण भागासाठी ₹2,500 रक्कम बंधनकारक आहे.
इंडसइंड बँकेच्या A आणि B श्रेणी शाखांमध्ये ₹10,000 आणि K श्रेणी शाखांमध्ये ₹5,000 किमान शिल्लक ठेवावी लागते.
येस बँक ग्राहकांनी ₹10,000 शिल्लक राखावी लागते. ही रक्कम न ठेवल्यास दरमहा ₹500 पर्यंत दंड आकारला जातो.
ICICI बँकेत मेट्रो आणि शहरी भागात ₹10,000, निमशहरी भागात ₹5,000, तर ग्रामीण भागात ₹2,000 शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. काही खात्यांसाठी ही रक्कम ₹1,000 सुद्धा असू शकते.
कोटक महिंद्रा बँकेच्या एज सेव्हिंग खात्यांसाठी ₹10,000 मासिक शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. ही अट न पाळल्यास ग्राहकांना ₹500 पर्यंत दंड भरावा लागतो. मात्र Kotak 811 या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
या माहितीचा उद्देश ग्राहकांनी त्यांच्या खात्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे आणि अनावश्यक शुल्क टाळावे हा आहे. त्यामुळे खात्याशी संबंधित नियम वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.