नमस्कार मित्रांनो पूर्वी बँकेतून कर्ज घेण्यासाठी प्रत्यक्ष शाखेत जावे लागायचे. पण तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने कर्ज मिळवू शकता? आजच्या लेखात आपण ॲक्सिस बँक पर्सनल लोन कसे मिळवायचे, कोण पात्र आहे आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
ॲक्सिस बँक पर्सनल लोनसाठी पात्रता
1) अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
2) मासिक उत्पन्न रु. 15,000 किंवा त्याहून अधिक असावे.
3) CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून जास्त असावा.
4) वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
व्याजदर आणि परतफेड योजना
ॲक्सिस बँक वैयक्तिक कर्जावर व्याजदर 10.75% पासून सुरू होतो.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर EMI कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे, जिथे तुम्ही कर्जाची रक्कम, कालावधी आणि व्याजदराच्या आधारे मासिक हप्ता (EMI) सहज गणना करू शकता.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) उत्पन्न प्रमाणपत्र
4) 6 ते 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
5) सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी ओळखपत्र
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1) ॲक्सिस बँक मोबाईल एप डाउनलोड करा.
2) एप उघडून लॉगिन बटणावर क्लिक करा.
3) तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP व्हेरिफाय करा.
4) एकदा खाते व्हेरिफाय झाल्यावर, कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा.
ॲक्सिस बँक जलद आणि सोप्या प्रक्रियेद्वारे वैयक्तिक कर्ज देते. तुम्ही ऑनलाइन अर्ज करून, घरबसल्या कर्ज मिळवू शकता. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.