मित्रांनो आपल्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासाठीच एनपीएस वात्सल्य योजना एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेत दर महिन्याला फक्त एक हजार रुपये गुंतवून तुम्ही मुलांसाठी मजबूत आर्थिक आधार तयार करू शकता.
जर तुम्ही मुलाच्या जन्मापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर त्याला मोठा फंड मिळू शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही दरमहा एक हजार रुपये मुलाच्या नावावर गुंतवले आणि ही गुंतवणूक अठराव्या वर्षापर्यंत सुरू ठेवली, तर एकूण दोन लाख सोळा हजार रुपये गुंतवले जातील. जर या रकमेवर सरासरी दहा टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर अठरा वर्षांच्या शेवटी ती रक्कम सुमारे सहा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षांचे झाल्यावर या योजनेतील काही पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. उरलेली रक्कम पेन्शन योजनेत वळवली जाते. जर ही गुंतवणूक पुढे साठ वर्षांपर्यंत चालू ठेवली, तर अंदाजे चार कोटी रुपयांचा पेन्शन फंड तयार होऊ शकतो.
या योजनेचे आणखी काही फायदे आहेत. यात चक्रवाढ व्याजामुळे जास्त परतावा मिळतो. शिवाय गरजेच्या वेळी शिक्षण किंवा वैद्यकीय खर्चासाठी काही अंशता पैसेही काढता येतात. ही योजना विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय देते, ज्यामुळे जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधता येतो.
अखेरीस कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घेणे आणि जाणकारांचा सल्ला घेणे नेहमीच आवश्यक असते.