60 लाखाचे होमलोन घेतल्यास किती EMI भरावा लागेल ? पहा सविस्तर माहिती

By Pramod

Updated on:

Follow Us
60 lakh home loan EMI calculation

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया कडून होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी महत्वाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे घरांच्या किंमती खूप जास्त वाढल्या आहेत.यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

आपल्या आवडत्या ठिकाणी घर विकत घ्यायचं म्हटले की लाखों रुपये खिशात असणे आवश्यक आहे.आता सर्वसामान्य नागरिकांची एवढी सेविंग नसते.यामुळे अनेक लोकं होम लोन घेऊन घर खरेदीचा निर्णय घेतात.

देशातील जवळपास सर्वच बँका आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन ऑफर करत असतात.तसेच बँकेकडून कमीत कमी काळात ग्राहकांना होम लोन मंजूर केले जाते. एसबीआय देखील आपल्या ग्राहकांना कमी वेळेत व कमी व्याजदरात होम लोन देत असून आज आपण एसबीआयच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत.

एसबीआय च्या होम लोनचे व्याजदर व एसबीआय कडून जर एखाद्या ग्राहकाने 60 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर त्याला कितीचा ईएमआय भरावा लागणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आज आपण जाणून घेणार आहोत.

एसबीआयचे व्याजदर आरबीआय ने अलीकडेच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली होती यामध्ये एसबीआय, एचडीएफसी व आयसीआयसीआय फक्त या तीनच बँकांचा यामध्ये समावेश होता.

एसबीआय ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक असून या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

होम लोन बाबत जाणून घ्यायचे झालं तर बँक 8.25% किमान व्याज दरात होम लोन उपलब्ध करून देते. परंतु हा या बँकेचा किमान व सुरुवातीचा व्याजदर आहे. याचा लाभ फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच मिळतो.

800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या नागरिकांना एसबीआयकडून किमान 8.25 टक्के व्याज दरात होम लोन मंजूर केले जाऊ शकते. 10 वर्षांसाठी 60 लाखाचे होम लोन घेतले तर किती हप्ता भरावा लागणार? जर तुम्ही एसबीआयकडून 10 वर्षांच्या कालावधीसाठी 60 लाखांचं गृहकर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा 73,592 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील.

तुम्हाला दहा वर्षात 88 लाख 30 हजार 989 रुपये बँकेला द्यावे लागणार आहे ज्यामध्ये 28 लाख 30 हजार 989 रुपये व्याज राहील. जर समजा तुम्ही एसबीआय कडून तीस वर्षांच्या कालावधीसाठी 60 लाखांचे गृह कर्ज घेतलं तर तुम्हाला 45 हजार 76 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

अशा वेळी तुम्हाला एक कोटी 62 लाख 27 हजार 359 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. अर्थातच एक कोटी दोन लाख 27 हजार 359 रुपये व्याज द्यावे लागणार आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या गुंतवणूक,कर्ज,बँकिंग हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.