मंडळी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे सूक्ष्म उद्योगांसाठी खास क्रेडिट कार्ड सुविधा. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे लघुउद्योगांना आर्थिक मदत आणि व्यवसाय वाढीसाठी सहज कर्जसुविधा उपलब्ध करून देणे.
या क्रेडिट कार्डची मर्यादा किती?
हे खास क्रेडिट कार्ड Enterprise Portal वर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी तयार करण्यात आले आहे. याची मर्यादा ५ लाख रुपये इतकी असणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार पहिल्या टप्प्यात १० लाख सूक्ष्म उद्योगांना ही क्रेडिट कार्ड सुविधा दिली जाणार आहे.
नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
जर तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालीलप्रमाणे नोंदणी करावी लागेल.
1) सर्वप्रथम https://msme.gov.in या अधिकृत एंटरप्राइझ पोर्टलला भेट द्या.
2) Quick Links या विभागावर क्लिक करा.
3) Udyam Registration या पर्यायावर क्लिक करून आपली उद्योग नोंदणी पूर्ण करा.
4) या नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रतेबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.
नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही या खास क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.
आधीच करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा
गेल्या अर्थसंकल्पातही एमएसएमई क्षेत्रासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये क्रेडिट गॅरंटी कव्हरची मर्यादा ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आली होती. तसेच २७ प्राधान्य क्षेत्रांतील कर्जांसाठी १% कमी शुल्क देण्यात येणार असून, स्टार्टअप्ससाठी गॅरंटी कव्हर १० कोटींवरून २० कोटी रुपये करण्यात येणार आहे.