मंडळी जर तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल आणि जोखीम टाळायची असेल, तर पोस्ट ऑफिसची एफडी योजना एक चांगला पर्याय आहे. या योजनेत १, २, ३ आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवता येतात. तुम्ही ५ वर्षांच्या एफडीमध्ये पैसे गुंतवले, तर तुमचे पैसे ७.५ टक्के दराने वाढतात आणि हेच पैसे तुम्ही दोन वेळा पुन्हा एफडीमध्ये गुंतवले, तर एकूण १५ वर्षांमध्ये तुमची रक्कम जवळपास तिप्पट होऊ शकते.
उदाहरण द्यायचं झालं, तर जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला सुमारे २.२५ लाख रुपये व्याज मिळेल. त्यामुळे एकूण रक्कम ७.२५ लाख होईल. हीच रक्कम पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा गुंतवली, तर एकूण रक्कम १०.५१ लाख होईल. आणि जर तुम्ही आणखी एकदा ५ वर्षांची मुदतवाढ दिली, तर १५ वर्षांनी तुम्हाला सुमारे १५.२४ लाख रुपये मिळतील. त्यामुळे मूळ गुंतवणुकीच्या तुलनेत तीन पट परतावा मिळतो.
या योजनेत इन्कम टॅक्स अॅक्ट ८० सी अंतर्गत करसवलतही मिळते. एफडी संपल्यावर ती पुन्हा सुरू करायची असल्यास, विशिष्ट कालावधीत ती मुदतवाढ करता येते. १ वर्षाच्या एफडीसाठी ६ महिन्यांच्या आत, २ वर्षांच्या एफडीसाठी १२ महिन्यांच्या आत आणि ३ किंवा ५ वर्षांच्या एफडीसाठी १८ महिन्यांच्या आत मुदतवाढ केली जाऊ शकते. खाते उघडताना सुद्धा तुम्ही ही मुदतवाढीची विनंती नोंदवू शकता.
एफडीच्या कालावधीत व्याजदर स्थिर राहतो, पण जर मुदतवाढ केली तर त्या वेळी लागू असलेला नवीन व्याजदर लागू होतो.
अशा प्रकारे, पोस्ट ऑफिस एफडी ही एक सुरक्षित आणि सोपी गुंतवणूक योजना आहे, जी दीर्घकाळात चांगला परतावा देऊ शकते.